भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम खंडी नैनवाडी येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.*

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


*भामरागड:-* तालुक्यातील अतिदुर्गम खंडी नैनवाडी येथे व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते झाले.प्रसंगी बोलतांना अहेरी ऊपविभागात पुर्वी मोजक्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या परंतू आता सर्वच खेळांचे स्पर्धा होत असतांना दिसत आहेत ते सुध्दा सर्वच अतिदुर्गम भागात सुरु आहेत ही आनंदाची बाब आहे.आपल्या भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असल्याने असे स्पर्धा झाल्यास खेळाडूंना पोषक वातावरण मिळेल असे प्रतीपादन केले.महत्वाचं म्हणजे या गावात पहिल्यांदाच भव्य व्हॉलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात तब्बल ४२ संघ सहभाग घेतले आहे.

पुढे बोलतांना क्रिडा ही मानवी जिवनात आवश्यक बाब असते अशा स्पर्धांचे आयोजन करतांना गावकर्‍यांची एकजूटसुध्दा दिसते.सुशिक्षीत युवकांनी खेळांप्रमाणे गावाच्या विकासासाठी सुध्दा एकजुटीने पुढाकार घेतल्यास गावाचा नक्कीच सर्वांगीन विकास होऊ शकतो असे ते बोलले.


प्रसंगी कार्यक्रमाला युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,अर्जुन आलाम भाजपा तालुका अध्यक्ष भामरागड,सम्मा कटीया कुडयामी गाव पाटील,कु.काजल मधुकर दुर्वा सरपंच ग्रामपंचायत टेकला,वेलादी सर ग्रामसेवक, झाकीर हुसेन, लालसू कोवसी, विनोद एक्का,संतोष कोवसी,अर्जुन टोप्पो, संजय टाप्पो, मनोज मडावी झुरू मडावी, आदी ऊपस्थित होते.!


0/Post a Comment/Comments