तिन माओवाधी ठार तर दुदैवाने एक जवान ठार तर दुसरा जखमी. महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील चकमक.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली जिल्हातील भामरागड सिमेवर व छत्तीसगडमधील नारायणपूर सिमेवर C 60 जवान व माओवादी मधील ७२ तास चाललेल्या  चकमकीत आज दि. ६ फरवरी सकाळच्या सुमारास चकमकीत 3 माओवादीना ठार मारण्यात जवान यशस्वी झाले माओवादींची ओळख अजुनही पटली नाही परंतु C 60 च्या तुकडीतील एक जवान दिपक चिन्ना मडावी ३८ वर्ष रा. मांड्रा दामरांचा तालुका अहेरी यांना दुदैवाने विरमरण आले तर जवान जोगा मडावी रा. किष्टयापल्ली हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सुधारत असून दोघांनाही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर मृत्यक जवान चिन्ना मडावी याचे मृत्युदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे आनण्यात आले व त्यांना सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
तिन नक्षलवाद्यात 2 पुरुष व एक महिला यांचे मृत्युदेह हस्तगत करण्यात आले असुन त्यांचेकडून १के ४७ व बराच शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असुन माओवांद्याची ओळख अघाप पटलेली नाही. सदर जंगल परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

0/Post a Comment/Comments