प्रलंबित मागण्या दिलेल्या मुदतीत मान्य न झाल्यास आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा उभारणार... काँ, विनोद झोडगे यांचा कंत्राटदार आणि महसूल प्रशासनाला त्वरित दखल घेण्यासाठी अल्टीमेटम... ... रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी उभारलेल्या रास्ता रोको चक्काजाम आंदोलन यशस्वी ...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
ब्रह्मपुरी -
गांगलवाडी ते व्याहाड रस्ता जलद गतीने पूर्ण करा. मेन रोडचे खड्डे त्वरित बुजवा, हायवा ट्रकने होणारी  जड वाहतूक थांबली पाहिजे, मुडझा ते गांगलवाडी रस्त्यावर नियमित पाणी मारा. मेन रोडच्या उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना नुकसान भरपाई मदत द्यावी. गांगलवाडी मूडझा आवळगाव  येथील शालेय विद्यार्थ्यांना (ब्रह्मपुरी आगारातून) ब्रह्मपुरी ते मुडझा करिता बसफेऱ्या वाढवा. या सह अन्य प्रलंबित मागण्यांना घेऊन रविवार दिनांक १ फेब्रुवारी२०२६ दुपारी १२:०० वाजता गांगलवाडी टी पॉईंट जवळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका कौन्सिल ब्रह्मपुरीच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यापूर्वीच कॉम्रेड विनोद झोडगे यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. अखेर लढा यशस्वी ठरला! आणि प्रशासनाने रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र होऊ नये म्हणून खबरदारी घेतली. वेळीच प्रशासनातर्फे नायब तहसीलदार बोभाटे तर रोडचे कंत्राटदार मिश्रा यांनी ब्रह्मपुरी ते ठाणेदार प्रमोद बांनबले यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत चोक बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी मुख्य चक्काजाम आंदोलनासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ, विनोद झोडगे , कॉ.डॉ.महेश कोपुलवार, अँड जगदीश मेश्राम यांच्या नेतृत्वात पार पडला. विनोद झोडगे स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा केली. दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी ब्रह्मपुरी च्या नायब तहसीलदार बोबाटे मॅडम,
कंत्राटदार मिश्रा, ठाणेदार प्रमोद बांनबले, सहायक पोलीस निरीक्षक खडसे साहेब, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब,यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.



रस्ता रोको चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धनराज ठाकरे, शरद ठाकरे, उसन ठाकरे, रामकृष्ण हुलके, सचिन बदन,संजय लोणारे, बंडू उरकुडे, सुरेश नखाते, योगाजी टेंभुर्णे,अमोल मानापुरे, मुखरु झोडगे, भिवाजी ठाकरे, डाकराम सेमसकार, रामदास सालोटकर, तोंडफोडे, नकटु कोराम, सुनील भोयर, विनोद पाटील, मनोहर भरे , चरण तिवाडे, दत्तू नरुले, विजय उरकुडे, अनिल हनवते, जिजाबाई गरमळे, शकुनतला खोब्रागडे, ताराबाई ठाकरे यांच्यासह अन्य शेकडो पेक्षा जास्त  शेतकरी,शेतमजूर व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments