विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली -दिनांक ०७ फरवरी २०२६ ला गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शि तालुका अंतर्गत ग्राम ठाकरी इथे पारंपरिक इलाका महाग्रामसभा चौडमपल्ली/लगाम ४२ गावांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती.
आयोजित ग्रामसभेमध्ये उपस्थिति दर्ज केलेले जिल्हा महाग्रामसभा उपाध्यक्ष डाक्टर साईनाथ कोडापे, जिल्हा महाग्रामसभा सलाहकार रविन्द्र कोवे महाराज, इलाका महाग्रामसभा अध्यक्ष सत्यवान सिडाम, ठाकरी ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ कुऴमेथे मॅडम, इलाका महाग्रामसभा सचिव, जिल्हा भुमक संघाचे अध्यक्ष शेडमाके, इलाका सहसचिव तिरु सोयाम, इलाका महाग्रामसभा सचिव व इतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन प्रथमत: सत्कार करण्यात आले.
सदर ग्रामसभेत मौजा ठाकरी इथे दिनांक ०१ मार्च २०२६ ला होणा-या राष्ट्रीय शहिद क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वरबापु शेडमाके ह्यांचे पुतळ्याचे लोकार्पण समारोह, सल्ला गांगरा स्थापना व सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता इलाक्यातील सार्वमतातुन भरभरुन उपस्थिति दर्शविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सदर पारंपरिक इलाका महाग्रामसभा चौडमपल्ली/ लगाम वतीने ठाकरीच्या ग्रामसभा बैठकित विविध विषयावर सकारात्मक चर्चा करुन सर्वानुमते समुदायाच्या सर्वांगीण हितास्तव बाबीवर अग्रक्रमाने संगठीत राहुन समन्वयाने विकासात्मक वाटचालीवर भर दिला.
सदर ग्रामसभा सफल करण्याकरीता ठाकरी गावातील ७घरात वास्तव्य करणारे गोंडीयन परिवार, मडावी सर तथा ठाकरीच्या सरपंच कुळमेथे ताई ह्यांनी विशेष योगदान प्रदान केले.
पेरसापेन प्रकृति सृष्टि पहांदी पारी कुपार लिंगों ठाकरी गावातील समुदायाच्या सर्वांगीण हितास्तव विकासाकरिता सदैव कार्य करण्याचे ठरविण्यात आले.


Post a Comment