भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर देशव्यापी विशाल महारॅली .

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


     गडचिरोली - भारत मुक्ती मोर्चा , राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर देशव्यापी विशाल महारॅली काढण्यात आली . तसेच धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले .

     बामसेफचे ४२ वे भारत मुक्ती मोर्चाचे १५ वे राष्ट्रीय अधिवेशन ओडीसा राज्यात कटक येथे दि २६ ते ३० डिसे . २०२५ ला पूर्व परवानगीने आयोजित करण्यात आले होते . परंतू ऐन वेळी तेथील सरकारने अधिवेशन रद्द केले . त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च झाला . यावरून सरकार हे संविधान व लोकशाहीला मानत नाही . त्यामुळे चार चरणबद्ध देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे . रॅली प्रदर्शनात सरकारच्या



 विरोधात घोषणाबाजी करून निषेद करण्यात आला .
    या रॅलीला सुनिता कसबे राष्ट्रीय प्रसारक बामसेफ नई दिल्ली , कामराज लोखंडे जिल्हाध्यक्ष असंघटीत कामगार , चंद्रमनी शेंभरकर गडचिरोली लोकसभा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांनी मार्गदर्शन केले . सुनिता कसबे राष्ट्रीय प्रसारक बामसेफ म्हणाल्या की , संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी २२ फेब्रुवारी ला नागपूरच्या आरएसएस मुख्यालयाला घेराव घालण्यास कोट्यावधी लोकांनी सहभागी व्हावे .
     निषेध सभेचे संचालन प्रमोद राऊत यांनी केले तर आभार वर्षा कन्नाके यांनी मानले .
     यावेळी भोजराज कान्हेकर , प्रेमदास रामटेके , शिवाजी नरोटे , लवकुश भैसारे, नामदेव दुधे, अशोक शेंभरकर , मोरेश्वर निमगडे , श्रावण मेश्राम , दामोधर शेंडे , ज्ञानेश्वर काटवले , डोमाजी गेडाम,  जयंत गेडाम , श्रीरंग उंदिरवाडे , तुळशिराम सहारे, मोरेश्वर निमगडे, लता रामटेके , सविता लाटीलवार , प्रेमलता कान्हेकर , निशा बोदेले, अमिता भैसारे , वृक्षाली उंदिरवडे , सुनंदा बांबोळकर , माया मेश्राम , कल्याणी गोंडाणे , शुभांगी देवगडे , मंगला बाबनवाडे , बेबी उंदिरवाडे उपस्थित होते .


0/Post a Comment/Comments