विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - निखिल मुक्ता गणेश शेंन्डे वय ४२ वर्ष शाहुनगर यांचे अकस्मित निधन झाले. निखिल हा पंचायत समिती एटापल्ली येथे कारकुन या पदावर कार्यरत होता. प .सं ची टपाल नेण्याकरीता गडचिरोली आला असता शाहुनगर येथील आपल्या राहते घरी संडासमधे पडला त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना दि. ८ फरवरीला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते परंतु त्यांना निरामन हास्पीटल नागपूर येथे भरती करण्यात आले होते परंतु दुदैवाने दि. १७ फरवरी दुपारी 3 चे दरम्यान मृत्यु झाला.
निखिल यांच्या पश्चात आई मुक्ता व बहिण असा परिवार असुन त्यांच्या अकस्मित मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असुन उद्या दि. १८ फरवरी दुपारी १२ वाजता कठाणी नडिघाटावर अंत्यसंस्कार करून त्यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात येइल असे त्यांची आई मुक्ता गणेश शेंन्डे हिने कळविले आहे.

Post a Comment