विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
जिल्हा मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोरला या गावांमध्ये संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पोर्ला कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री रविंद्रजी सेलोटे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला व पूजाअर्चा करण्यात आली या जयंतीला पोर्ला गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि गावातील कुणबी समाज बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते याच ठिकाणी जवळपास दहा वर्षापासून जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांची जयंती व तुकाराम बीज खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या कार्यक्रमाचे संचालन पोर्ला गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री सुधीर चुधरी यांनी केले

Post a Comment