कोटगल मध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात; डॉ. देवराव होळी यांची विशेष उपस्थिती


विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - गडचिरोली शहराला लागूनच असलेल्या कोटगल येथे महिला मंडळ, गावकरी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने *“जागर स्त्री शक्तीचा”* या महिला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विशेष उपस्थिती लाभली.
या २ दिवसीय कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, धावणे (रनिंग) स्पर्धा, कबड्डी स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आपली कला, क्रीडा कौशल्य आणि सांस्कृतिक प्रतिभा सादर केली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आज महिला शिक्षण, क्रीडा, उद्योग, सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देत असून समाजाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. महिलांना योग्य संधी व प्रोत्साहन दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंचावर या जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशाली नरोटे, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली पोलीस स्टेशन च्या PSI माधुरी मिसाळ, जिप माजी सभापती छाया कुंभारे, कोटगल ग्रामपंचायतच्या सरपंच ममता दुधाबावरे, उपसरपंच तेजप्रभा नैताम, पायल कोडापे, मोहिनी ठाकरे, माजी सरपंच वैशाली पोरेड्डीवार, तमुस अध्यक्ष मोहन ठाकरे, ग्रामसेवक एन. एम. मारगाये, राजेश चिलमवार सर, दिलीप भुरसे, सुधाकर दूधबावरे, डॉ. बोदेले, शिवाजी भोयर, गिरीधर मेश्राम, से.नि. PSI भोगेवार साहेब आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्यांसह गावकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जागर स्त्री शक्तीचा” या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून समाजात सकारात्मक संदेश गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments