जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोजबी येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आरमोरी

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दि. 19..2..2026 गुरुवार रोजी रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्याने जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब जुमनाके तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार दिनेश बनकर उपसरपंच प्रवीण चहांदे विनोद,मानकर मुख्याध्यापक चिलबुले सर आरोग्य सेविका धोटे मॅडम शेंडे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून शिवाजी महाराज यांचा गौरव करण्यात आला. जयंतीच्या निमित्याने मान्यवरांनी



 शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचा उलगडा करून उपस्थित विद्यार्थी मित्र पालक वर्ग यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन प्रशांत ठेंगरी सर तर आभार प्रदर्शन सौ. आखाडे मॅडम यांनी मानले . जयंती कार्यक्रमाला बहुसंख्य महिला विद्यार्थी पालक युवा वर्ग यांची उपस्थिती होती . जयंती उत्सव पार पाडण्या करिता  गावातील युवक विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments