पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षलवादी ठार एक सी..60 कमांडो शहीद..


Vidharbh dakhal news February 05, 2026
गडचिरोली 


महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट अभूझमाड जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून महाराष्ट्र पोलिस दलातील सी-60 पथकाचा एक जवान शहीद झाला आहे. ही घटना गुरुवारी (६ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 विशेष कमांडो पथकाने नक्षलविरोधी शोधमोहीम सुरू केली होती. याच दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
या चकमकीत तीन नक्षलवादी जागीच ठार झाले. घटनास्थळावरून AK-47, SLR यांसारखी शस्त्रे व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबारात गंभीर जखमी झालेले सी-60 कमांडो दीपक चिन्हा मडावी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा वीरमरण झाला. आणखी एक जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


अभूझमाड जंगल परिसर हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी सातत्याने सुरक्षा दलांकडून मोहिमा राबविण्यात येत आहेत. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींना मोठा धक्का बसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहीद जवान दीपक मडावी यांच्या बलिदानाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत व सन्मान देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे

0/Post a Comment/Comments