विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज ब्युरो
देसाईगंज
देसाईगंज तालुक्यातील तुळशी कोकडी येथील रहिवासी असलेले
प्रसिद्ध दमा वैद्य श्री प्रल्हाद सोमाजी कावळे यांचे दि.6..1..2026 मंगळवार रोजी दुपारी 3 वाजे सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. प्रल्हाद कावळे हे दमा औषधी करिता दमा वैद्य म्हणून प्रसिद्ध झाले होते त्यांची दम्याची औषध बऱ्यापैकी प्रसिद्ध झाली होती आणि त्यांनी बऱ्याच लोकांना दम्यातून मुक्त सुद्धा केले होते अख्या विदर्भातून महाराष्ट्रातून दम्याच्या औषधीकरिता त्यांच्याकडे दमा रुग्णाची दमा औषधीकरिता मृग नक्षत्राचे सुरुवातिच्या दिवशी रांग लागत होती हे विशेष..! प्रल्हाद सोमाजी कावळे यांची शासनाने सुद्धा त्यांची दखल घेतली होती आणि त्यांचा सत्कार सन्मान सुद्धा करण्यात आला होता. त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी कोकडी येथे होणार असल्याचे आप्तेष्टांकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भ दखल न्यूज परिवार यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली...


Post a Comment