पोर्ला येथील व्यायामशाळा व क्रिडागणांचे भूमीपुजन

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली 


गडचिरोली - ग्रामपंचात पोर्ला व वसा यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत खुली व्यायामशाळा व क्रिडांगणाचे भुमिपुजन पोर्ला ग्रामपंचायत च्या सरपंच निवृत्ताताई राऊत व वसाचे सरपंच मुखरुजी झोडगे यांचे हस्ते पार पडले.
तरुण युवकांना व्यायाम करणे आवश्यक असतो मागे पुढे पोलीस भरतीत याचा फायदा होवू शकतो तसेच व्यायामाने आपले शरीर , आरोग्य चांगले राहु शकतो हाच दुरदृष्ठीकोण समोर ठेवून ग्रामपंचायत पोर्ला व वसा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही गावच्या सिमेवर लोक वर्गणीतून खुल्या मैदानावर क्रिडागण उभारले आहे. याचा फायदा तरुण मंडळींनी घ्यावा अश्या प्रकारचे मार्गदर्शन पोर्लाच्या सरपंच्या निवृत्ताताई राऊत यांनी केले व क्रिडागणाचे भूमीपुजन केले.
सदर भुमीपुजनाच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत पोर्ला चे उपसरपंच सुजीत पाटिल राऊत ग्रामपंचायत सदस्य अनिल चापले , अजय चापले ,रेखाताई शेंदरे , लिलाताई उंदिरवाडे ग्रामपंचायत वसा येथील सदस्य प्रितेश अंबादे, शिवराम नैताम , मंगलाताई भोयर , पोर्ला ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी निमगडे पोलीस पाटिल मुरारी दहिकर पोर्लाचे पोलीस पाटिल हितेंद्र बारसागडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाल गेडाम सामाजिक कार्यकर्ता रवि सेलोटे वनपाल रोकडे वनरक्षक विकास शिवणकर वसाचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नैताम , मधुकर बानबले , पुनित उपासे , चंद्रकांन्त निकुरे , परशुराम भोयर , ईश्वर तिवाडे , देविदास चापले सहीत वसा - पोर्ला गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सदर उपक्रमाचे व दोन्ही सरपंच तसेच ग्रामसेवकांचे . कौतुक केले गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments