विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
आरमोरी तालुक्यातील बोरी येथील रहिवासी असलेल्या आणि चंद्रपूर येथे हल्ली मुक्कामाने वास्तव्याने राहत असलेल्या अर्चना खुशाल श्रीकोंडवार वय ४३वर्ष ह्या पतीसोबत एक महिन्या अगोदर काही कामानिमित्त दुचाकी ने जात असताना रस्त्यामध्ये त्यांचा अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती या गंभीर महिलेला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे मेयर हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मेंदूला मार असल्याने मेंदूचा ऑपरेशन करण्याकरिता सांगितले मात्र घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना ऑपरेशन करणे कठीण होते . मात्र महिलेच्या पतीने पैशाची जुळवाजुळव करून अपघातग्रस्त महिलेचा
ऑपरेशन सुद्धा करण्यात आला .याची माहिती वैरागड येथील सोनू गंगाधर लांजीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर व सचिव भारत कुमरे यांना दिली असता त्यांनी उपचाराकरिता महिलेला आर्थिक आधार म्हणून पंचवीस हजार रुपये धनादेश संस्थेच्या वतीन संस्थेच्या कार्यालयात देण्यात
आला. अपघातग्रस्त
महिलेला पुढील उपचाराकरिता संस्थेच्या वतीने आर्थिक मदत मिळाल्याने अपघातग्रस्त महिलेने संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर सचिव भारत कुमरे यांचे आभार मानले आहे सदर आर्थिक मदत ही विनोद दादा मसराम अखिल भारतीय आदिवासी संघटना उपाध्यक्ष नागपूर ,दीपक भाऊ इंगळे सामाजिक कार्यकर्ते नागपूर यांच्या पुढाकारातून आणि संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे अपघातग्रस्त महिलेला आर्थिक मदत देताना संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर सचिव भारत कुमरे संस्थेचे संचालक दिलीप नाकाडे संस्थेच्या कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धन संतोष तुरवडकर आकाश मडावी नीरज पितुलवार उल्हास बनपूरकर प्रल्हाद बोर्डे अविनाश लिंगायत आधी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment