अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक...


विदर्भ दखल न्यूज 
वर्धा ब्युरो



वर्धा 
मागील तीन वर्षापासून एका मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीस पकडून पोलिसांनी त्याला अटक केली आणि पळून ने णाऱ्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झाले आहे
एका पंधरा वर्षीय मुलीला हाऊस लावून पळून नेल्याची तक्रार सावंगी मेघे पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 15 सप्टेंबर 2015 ला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता सदर प्रकरण पुढील तपासणीसाठी मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता आणि या चमूने पोलीस अधीक्षक सौरव कुमार


 अग्रवाल यांच्या मार्गदर्शनातून तपासाकरिता नागपूर गाठले आणि मोठ्या शिताफीने पोलिसांनी आरोपी अमर अशोक नंदेश्वर वय 25 भीमवाडी थूल ले आऊट सिंधी मेघे यांना ताब्यात घेतले पोलिसांनी अल्पवयीन मुलीबद्दल त्याला विचारणा केली असता मुलगी त्याच्यासोबत राहत होती असे समोर आल्याने त्याला ताब्यात घेऊन वर्धा येथे आणण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली असून पीडित मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments