विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
अहेरी आगाराची बस अहेरी एटापल्ली कसनसुर जारावंडी मार्गे गडचिरोली जाणारी बस पूर्ववत सुरू करा परिसरातील नागरिकांची प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला मागणी..!
अहेरी येथील अहेरी आगाराची बस अहेरी बस स्थानकावरून अहेरी ते एटापल्ली, कसनसूर ,जारावंडी मार्गे गडचिरोली करिता जाणारी बस सकाळच्या सुमारास 7.30.वाजे अहेरी आगारातून सुटत होती.यामुळे परिसरातील प्रवासाधारकांना नागरिकांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयी
कामाकरीता जाण्याकरिता सोयीचे झाले होते आणि जिल्हा मुख्यालयातील कामे आटोपून दिवसभरातील वेळेमध्ये परिसरातील प्रवास धारक व लोकांना परत गावी येण्याकरीता सोयीचे होत होते . मात्र सध्याच्या घडीला 30 दिवसापासून अहेरी ते एटापल्ली, कसनसूर जारावंडी मार्गे गडचिरोली जाणारी बस बंद झाल्यामुळे परिसरातील प्रवाशांना लोकांना मोठा त्रास होत आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयी कामाकरिता जाण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत आहे मोठा त्रास सोसावा लागत आहे. परिसरातील प्रवासधारकांमध्ये. अहेरी येथील आगार प्रमुख व्यवस्थापनाने अहेरी, एटापल्ली ,कसनसूर जारा वंडीमार्गे गडचिरोली जाणारी बस पूर्वतर सुरू करावी अशी मागणी परिसरातील प्रवासधारकांनी लोकांनी प्रसिद्ध पत्रकातून प्रशासनाला केली केली आहे. अहेरी आगारातून 7.30 वाजे एटापल्ली कसनसुर जारावंडी मार्गे गडचिरोली जाणारी बस परिसरातील जनतेची प्रवासधारकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनात लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी परिसरातील प्रवासधारकांनी जनतेनि अहेरी आगार प्रमुख प्रशासनाला केली आहे .


Post a Comment