संघर्षातून व्यक्ती आत्मनिर्भर बनतो.. आशिष पाथोडे..

बाळकृष्ण उंबरकर 
 तालुका प्रतिनिधी 



नागभीड 
नागभीड _ संघर्ष हा जिवनाचा अविभाज्य भाग आहे यातूनच व्यक्ती आत्मनिर्भर बनते आणि स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द टिकून राहाते असे प्रतिपादन माजी विदयार्थी तथा प्रसिद्ध अभिनेता आशिष पाथोडे यांनी केले येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिकोत्सवा च्या उदघाटन प्रसंगी विध्यार्थ्यांना संघर्षाचे महत्व पटवून देताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अमीर धमानी होते मुंबई येथे स्थाईक झालेल्या आशिष पाथोडे यांनी काही चित्रपटात महत्वाची भुमिका साकारलेली आहे ते बालियुड व हालियुड च्या अनेक दिग्गज कलाकारांचे प्रशिक्षकही आहेत उदघाटक म्हणुन बोलताना त्यांनी मुंबईतील आपल्या संघर्षमय प्रवाशाची विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली शाळेतील शिक्षकांचा आशिर्वाद, पालकांचा विश्वास आणि स्वताची तळमळ यामुळेच यश मिळाल्याचे त्यानी सांगितले आपल्या मायभूमीत परतल्याचा सन्मान बघून भाराऊन गेल्याची भावना त्यानी व्यक्त केली विध्यार्थ्याना यशस्वी व्यक्तीचा अनुभवाचा लाभ मिळावा या उद्देशाने माजी विध्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता यात विविध क्षेत्रात यश मिळालेल्या दहा माजी विध्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आशिष पाथोडे यांनी नागभीड च्या मातीवर चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा व्यक्त केली आणी शाळेतील




 विध्यार्थ्यांना त्यात भूमिका देण्याचे आश्वासन दिले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबावर अवलंबून न राहता स्वताच्या कौशल्याने पूढे जाण्याचा संदेश त्यानी दिला अध्यक्ष डॉ अमीर धमानी म्हणाले जनता विधयालय हे यशस्वी व्यक्ती घडविणारी हिरयाची खाण आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी घडतात आशिष पाथोडे यांच्या संघर्षाची प्रेरणा विध्यार्थ्यांनी घ्यावी असे भाषणामधुन सांगितले या वार्षिकोत्सवा च्या कार्यक्रमाला सचिव डा रविंद्र कावळे, सहसचिव आर एम समर्थ, प्राचार्य एस टी कोरे, उपप्राचार्य सि यु रोहणकर, यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन मायकेल बोरकर, अश्विनी सोनोने यांनी केले तर आभार जि वाय बोरकर यांनी मानले

0/Post a Comment/Comments