यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय व जगदंबा विद्यालय विहिरगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दीन उत्साहात साजरी...



विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 



आरमोरी 
आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय व जगदंबा विद्यालय यांच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक माता सावित्रीबाई फुले तथा बालिका दिन 3 जानेवारी 2026 मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. माता सावित्रीबाई फुले यांच्या



 प्रतिमेला मान्यवरांच्या हस्तेपुष्प माला  अर्पण करण्यात आले यावेळी मान्यवरांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना सावित्रीबाईच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.
 . यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य लाखनकर सर मुख्याध्यापक म्हस्के सर प्रा.संदिप ढेंगरे,प्रा.रजनी पिलारे,, प्राजक्ता अर्जुनकर,शिक्षक बोरकर, वाकळे, मडावी भरडकर चेतराम म्हस्के, लिपिक पराग मगंर, अनिल कुनघाडकर अधिक्षक, राहुल पदा, रेखाताई भैसारे व विद्यार्थ्यां उपस्थित होते.या कार्यक्रमांचे संचालन शाळा नायक वेदांत अलाम, प्रास्ताविक प्रा.संदिप ढेंगरे यांनी केले  तर आभार कु.भुमिका सेलोटे हिने मानले..
तसेच विद्यार्थ्यांना वर्तुळाच्या विविध अंगाचें प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

0/Post a Comment/Comments