आंबोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात संपन्न...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील आंबोली येथील बुद्ध विहारात सावित्रीबाई महिला मंडळ आंबोलीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पोलीस पाटिल वंदनाताई रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटक सरपंच मालाताई मेश्राम वायगाव




 याचे हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून लता सुंदरवार मिना मेश्राम ज्योती कोडापे मायाताई कोडापे ताईबाई उंदिरवाडे सारंजाताई गोडबोले बौद्ध समाजाचे अध्यक्ष नामदेव मेश्राम उपाध्यक्ष भाष्कर रामटेके सचिव अशोक उंदिरवाडे प्रबुद्ध युवा मंडळाचे अध्यक्ष अजय मेश्राम आदि लाभले होते.
याप्रसंगी सरपंच मालाताई मेश्राम म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी हाल अपेष्ठा सहन करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले केली म्हणुन आज स्त्रि पुरुषांच्या बरोबरीने महिला देशाच्या पंतप्रधान ,राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या हे केवळ क्रातीज्योती सावित्रीबाईमुळे घडले



कार्यक्रमाचे संचलन महिला मंडळ आंबोलीच्या अध्यक्ष जयाताई रामटेके यांनी केले कार्यक्रमास करिष्मा गोडबोले शारदाबाई चुनारकर ममता राऊत वैशाली दुर्गे तेजाबाई उंदिरवाडे ललिताबाई उंदिरवाडे निर्मला रामटेके साईबाई दुर्गे शालत राऊत ममता पाटिल रेश्माबाई मेश्राम आदि साहित बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments