जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली येथे पत्रकार दिन संपन्न...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक - मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - जिल्हा पत्रकार संघ व संपादक संघ गडचिरोली च्या वतीने जिल्हा माहीती कार्यालय गडचिरोली येथे दि. ६ जानेवारी २०२६ ला पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जेष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा माहीती अधिकारी गजानन जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहीती अधिकारी जाधव यांनी आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला व पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले.


कार्यक्रमास पत्रकार मुकुंद जोशी नरेंद्र माहेश्वरी , टावर मडावी रेखाताई वंजारी , संगिता विजयकर धम्मपाल दुधे , मुकेश गेडाम , दिनेश बनकर , तन्मय देशपांडे , माहादेव बसेना ,दिनेश वरखडे , किरण आगे गुरुदास गेडाम आदि सहीत बहुसंख्य संपादक पत्रकार व जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी बहुसंख्येनी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments