विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथे दि. १२ जानेवारी २०२६ च्या रात्रौ १ ते २ च्या दरम्यान गावच्या वेशीवर हत्तीचा कळप आलेला होतो रात्रौ काही लोकांनी हत्तीच्या कळपाला बघीतले. हत्तीचा कळप मौशीखांब टोलीवरून सरळ मुरमाडी - गिलगांव मार्गाने प्रस्थान केला.
हत्तीच्या कळपाने मौशीखांब व टोलीच्या घराची नासाडी केली नाही परंतु सकाळी गावकऱ्यांना माहिती होताच गावकरी धास्तावले. यापूर्वीही हत्तीचा कळप दोनदा मौशीखांब गावात आलेले होते तेव्हा ते
पहाटेलाच तळ्याच्या पाळीने निघून गेलेत.
काल रात्रौ ८ वाजता अमिर्झा ते दिभना रोडवर बिपट्याचे दर्शन मौशीखांब गावातील चौधरी नामक व्यक्ती गडचिरोली ते अमिर्झा जात असतांना दिसला. एवढी मोठी हत्तीच व बिबऱ्याची दहशत असतांना वनविभाग चातगांव मात्र झोपेतच आहेत.


Post a Comment