विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळनगर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अमिता भैसारे होत्या . प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत संयोजक राष्ट्रीय किसान मोर्च , बाळुभाऊ टेंभुर्णे नगरसेवक तथा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , रवि मेश्राम नगरसेवक , अंजूम सय्यद नगरसेविका होत्या .
बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर म्हणाले की , सावित्रीबाई फुलेंनी घोर अपमान सहन करून महिलांना शिक्षणाचे दार खुले केले . नगरसेवक बाळुभाऊ टेंभुर्णे म्हणाले की , महिलांनी वडाच्या सावित्रीची पुजा करण्यापेक्षा जोतीरावाच्या सावित्रिची पुजा करावे . यावेळी प्रमोद राऊत , रवि मेश्राम ,अंजूम सय्यद, माजिद सय्यद यांनी मार्गदर्शन केले .
नगरसेवक बाळुभाऊ टेंभुर्णे , नगरसेवक रवि मेश्राम , नगरसेवक अंजुम सय्यद यांचा सत्कार पुष्पगुच्छ व भोजराज कान्हेकर लिखित पुस्तक ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? व धार लेखणीची काव्यसंग्रह देऊन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे संचालन निशा बोदेले यांनी केले तर आभार स्मिता म्हशाखेत्री यांनी मानले .
या कार्यक्रमाला दामोधर शेंडे , नरहरी बोदेले , डंबाजी बावनवाडे , संदिप साखरे ,मधूकर लाटीलवार किरण निकोसे , प्रेमलता कान्हेकर, माया मेश्राम, देवला डोंगरे , लक्ष्मी साळवे , इंदिरा वानखेडे, दिया सुखदेवे, आशा खोब्रागडे, रत्नमाला वाळके , सुरेखा ठाकूर, सिंदू भांडेकर , प्रियंका साखरे , शितल साखरे, सरिता शेंडे , अरुणा उंदिरवाडे , सुकेशिनी रामटेके , शुभांगी देवगडे, सुषमा ढवळे , मंगला बावनवाडे , वृक्षाली उंदिरवाडे , स्वाती वैद्य, निता उंदिरवाडे , खुशबू निकोसे, माजिद सय्यद आदि समाजबांधव उपस्थित होते .



Post a Comment