आरमोरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नगराचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून रुपेश पुणेकर विराजमान...



विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 





आरमोरी 
गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित प्रतिष्ठित महत्त्वाची समजली जाणारी नगरपरिषद आरमोरी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार अरविंद सावकार पोरेड्डीवार मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नगरपरिषद निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवून आरमोरी नगर परिषदेची सत्ता कायम ठेवली आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये  किंगमेकरच्या रूपातून प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी आपले




 नगरपरिषदेवर वर्चस्व कायम ठेवले आहे.   यामध्ये  रुपेश पुणेकर यांची जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांनी आज  दि.7..1..2026 बुधवार रोजी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती विराजमान झाले. सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, कृष्णाजी गजबे मा. आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रुपेश पुणेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतला . नगराध्यक्ष रुपेश पुणेकर हे आरमोरी नगराचे दुसरे नगराध्यक्ष ठरले आहेत. रुपेश पुणेकर आरमोरी नगरातील जनतेच्या विकासात्मक कामाच्या स्वप्नांना सदैव सार्थकी ठरतील असा. आशावाद आरमोरी नगरातील जनतेकडून व्यक्त होत आहे. आरमोरी नगरातील जनते कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments