चिखलामध्ये ट्रक फसला अन् गोवंश तस्करी फसली..


विदर्भ दखल न्यूज 
कोरची ब्युरो 
कोरची 


कुरखेडा ते कोरची महामार्गावर एक ट्रक चिखलामध्ये फसल्याने त्या ट्रक मध्ये असलेले गोवंश यांची सुटका करण्यात आली सदर घटना 20 जानेवारी रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारी रोजी कुरखेडा वरून कोरचीकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये काही गोवंश भरले होते आणि तो ट्रक जात असताना रस्त्याच्या कडेला उतरून चिखलामध्ये फसला त्यामुळे गोवंश तस्करी फसली. सदर ट्रकमध्ये बघितले असता त्यामध्ये काही गोवंश भरले होते त्यांना ट्रक मधून बाहेर काढून त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या सुरक्षित जोपासणे करिता त्यांच्या सुरक्षित देखभालीकरिता लाखनी येथील ध्यान फाउंडेशन गोशाळा येथे त्यांना रवाना करण्यात आले .. अज्ञात ट्रकच्या चालकाविरुद्ध कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरची पोलीस पोलीस करीत आहेत

0/Post a Comment/Comments