शिरोंचा पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर संपन्न...

विदर्भ दखल न्यूज 
शंकर अण्णा सेनिगारपू
तालुका प्रतिनिधी सिरोंचा





सिरोंचा - गडचिरोली पोलीस दल द्वारा आयोजित पोलीस दल स्थापना दिना निमित्य उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ७ जानेवारी २०२६ ला करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपविभागिय पोलीस अधिकारी संदेश नाईक सिरोंचा पोलिस निरिक्षक निखील फटिंग PSI नंदें साहेब आदि लाभले होते. सदर शिबिरात २५० युवकांनी रक्तदान



 केले. रक्ताची गरज भासणाऱ्या गरजुंना आधार निर्माण झाला. सिरोंचा सारख्या दुर्गम भागातील रुग्णाना रक्ताची गरज पडल्यास त्यांना योग्यवेळी रक्त पेटीतून


 रक्त मिळू शकतो व रुग्णाचा प्राण वाचू शकतो म्हणुन आपण आपली सामाजिक बांधीलकी समजुन युवकांनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहनही उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांनी केले.

0/Post a Comment/Comments