विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी शहरा जवळ असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर एका अज्ञात इसमाचे शव आढळल्याने मोठी परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. परिसरामध्ये दुर्गंधीचा श्वास सुटल्याने इकडे तिकडे शोधाशोध केली असता एका अज्ञात इसमाचे शव आढळून आले आहे. सदर घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन मृत इसमाचा पंचनामा करून मृताचे शव ताब्यात घेण्यात आले व प्रेत उतरणय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. सदर मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे अंदाजे वय व शरीरावरील कपडे आणि काही ओळखीच्या खुणाच्या आधारे ओळख पटवी ण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र सदैव मृत्यू हा नैसर्गिक की घातपात आहे की अथवा नदीपात्रात बुडाल्यामुळे झाला असावा याचा तपास सुरू असून प्रत्यक्ष तपासणी अंति ठरणार आहे सदर मृत्यूप्रकरणी आरमोरील पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत


Post a Comment