विदर्भ दखल न्यूज
संपादक - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
नागपूर - निलंबित औषधी निर्माण अधिकारी वर्ग 3 महेश प्रभाकर देशमुख ग्रामीण रुग्णालय रजेगांव जिल्हा गोंदिया व मंजुषा महेश देशमुख उर्फ मंजुषा दामोधर बंड अधिपरिचारिका वर्ग 3 जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांना एक पती पत्नी हयात असतांना घटस्फोट न घेता नियमबाह्य दुसरा विवाह करत गंभीर प्रकारची गैरवर्तनुक केल्याने (म .ना .से ) वर्तणुक अधिनियम 1979 मधील कलम 26 चे उल्लंघन केल्याने तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त मुकुंद नारायणभाई जोशी गडचिरोली हे दि. 26 जानेवारी २०२६ पासून उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ , नागपूर दिक्षाभुमी जवळील कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.
उपसंचालक शंभरकर साहेब आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर यांना सदर घटनेबाबत निवेदन देऊन अजुनही कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही म्हणुन कलम 26 चे उल्लंघन करणारे महेश देशमुख व मंजुषा बंड यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता पत्रकार मुकुंद जोशी ठिय्या उपोषणाला बसले आहेत.


Post a Comment