विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - १८१८ मधे ५०० महार शुरविरांनी पेराव्यांच्या संपूर्ण सैन्याशी लढण्याचे जे धैर्य दाखविले व पेशव्यांचा नायनाट केला. तो संघर्ष आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि पुढची दिशा दाखवतो म्हणुनच बाबासाहेबांच्या विचारांनुसार भिमाकोरेगांव शौर्य दिनी आपण ठाम संकल्प करूया की मी
संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन LIC विकास अधिकारी जयवंत सत्यविजय देवतळे यांनी भिमा कोरेगांव शौर्य दिना निमित्य केले.
भिमा कोरेगांव शौर्यदिनाचा कार्यक्रम वैनगंगा नदिकिनारी (व्याहाड ) येथे शेड्युल कास्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षते खाली ध्वजारोहन पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे नेते गोपाल रायपुरे प्रदेशचे सरचिटणिस शिद्धार्थ सुमन शेकाफे चे जिल्हाध्यक्ष पंडीत पाटिल मेश्राम संजय मेश्राम एन.डी पिंपळे चंद्रपुर सहाय्यक पो. निरिक्षक शरद मेश्राम आदि लाभले होते.
कार्यक्रमात गायक विजय शेंन्डे यांचा भिमगिताचा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाच्या यशविस्तेकरीता अरुण शेन्डे दिलीप गोवर्धन रुपेश सोनटक्के हेमंत मेश्राम मिलिंद भानारकर एन.बी लाळे निलकंठ सिडाम अमोल मेश्राम शरद लोणारे चेतन सहारे सुनिता राऊत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गडचिरोली - चंद्रपूर जिल्हयातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.



Post a Comment