नाव शौचालय.. मात्र तिथे पाणीच नाही... शौचाकरिता विद्यार्थी जातात घरी. तलावाकडे... प्रशासनाचे दुर्लक्ष


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 
आरमोरी 



तालुक्यातील कोजबी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने एक ते दोन वर्षाच्या कालखंडामध्ये नवीन  शौचालय ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात आले मात्र त्या शौचालय मध्ये पाण्याची जोडणी न केल्याने शौचालय नावाचीच शोभेची वस्तू ठरत आहे. सदर शौचालय पूर्ण अवस्थेत सुद्धा बांधून झाले आणि त्या शौचालयामध्ये पाण्याची टाकी नळ सुद्धा फिटिंग



 करण्यात आले मात्र त्या टाकीला पाण्याचा पुरवठा जोडणी नसल्याने शाळेतील विद्यार्थी शौचाकरिता घरी  जात असल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणावर ग्रामपंचायतच्या मार्फतीने खर्च करावयाचे बाबीची तरतूद आहे आणि या बाबीची तरतूद असल्याने ग्रामपंचायतीने शाळेमध्ये शौचालय बांधकाम केले मात्र शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊन बराच कालावधी झाल्याने  त्या शौचालयामध्ये पाण्याची जोडणे का? करण्यात आली नाही असा प्रश्न पालक वर्गांना पडला आहे. शाळेतील विद्यार्थी हे शौचाकरिता घरी येत असतात . आणि शाळेत लगत असलेल्या तलावाकडे सुद्धा जाऊ शकतात यामुळे काही अनुचित घटना सुद्धा होणे नाकारता येणार नाही मात्र प्रशासन शौचालयाला  पाण्याची जोडणी करण्याकरिता कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.प्रशासनावर पालक वर्गांचा रोष व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शौचालयाला पाण्याची जोडणी करून द्यावी अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.



ग्रामपंचायतचे सचिव कोविद  सोमनकर यांना आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शौचालयाचे काम पूर्ण झाले असून शौचालयाचे बिल सुद्धा पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र सदर काम माझ्या हयातीतील नसून सध्याच्या स्थितीत शौचालयाला पाण्याची जोडणी लवकरात लवकर  करू असे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments