विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांची जिल्हा महा ग्रामसभा गोटुल भूमी चांदाळा गडचिरोली येथे समाजसेवक देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात खालील ठराव व जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यात आदिवासी नेते नितिन पदा पयडी यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणुन साईनाथ कोडापे चामोर्शी महासचिव शिवाजी नरोटे पोटेगांव कोषाध्यक्ष विद्याताई दुगा तर सल्लागार म्हणून जेष्ठ आदिवासी नेते देवाजी तोफा माजी आमदार हरिराम वरखडे सचिन मडावी साहेब ॲड लालसु नागोटी भामरागड माधवराव गावढ सदानंद ताराम रविंद्र कोवे चामोर्शी पुण्याताई कुमरे सुनंदा देशमुख भारती इष्टाम भामरागड वर्षा कन्नाके गडचिरोली पौर्णीमा इष्टाम भामरागड वासुदेव कोडापे आदि
सदर ग्रामसभेचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यामध्ये करणार असुन प्रत्येक तालुक्यातून जिल्हास्तरावर दोन सदस्य राहणार आदिवासी बांधवाच्या समस्या सोडविण्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितिन पदा यांनी सांगितले.

Post a Comment