धानोऱ्यात आयटकचा तालुका मेळावा संपन्न आशा व गट प्रवर्तक यांना किमान वेतन लागू करा. कॉ झोडगे..


विदर्भ दखल न्यूज 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली:__आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना गडचिरोलीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष कॉ.विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समिती सभागृह धानोरा येथे आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना तालुका मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून मेळाव्याला सुरुवात झाली.सदर मेळाव्यात आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या विविध मागण्या विषयी चर्चा करण्यात आली ज्यामध्ये सप्टेंबर महिन्या पासून थकित मानधन देऊन यापुढे दर महिन्याच्या 5 तारखेला मानधन देण्यात यावे. . वीणा मोबदला कामे सांगू



 नये,ऑनलाइन कामाची शक्ती करू नये, गट प्रवर्तक कर्मचारी यांना कंत्राटी कामगार म्हणून मान्यता देऊन सर्व लाभ देण्यात यावे.त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.आशा वर्कर ला 26 हजार तर गट प्रवर्तक यांना 36 हजार वेतन देण्यात यावे.पगारी रजा मंजूर करण्यात यावी. रिटायर्ड वय मर्यादा 60 वरून 65 करण्यात यावी.म्हातारपणात पेन्शन लागू करण्यात यावी.सामाजिक सुरक्षा देण्यात यावी . ए. पी. ल. बी पी ल असा भेदभाव न करता सर्व केसेस वरील आशा वर्कारला मोबदला देण्यात यावा.मानधन वितरित करतांना कोणतीही कपात करण्यात येऊ नये. आशा व गट प्रवर्तक यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाखाचा विमा लागू करण्यात यावा, कोरोना काळातील थकित दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता ग्राम



 पंचायतस्तरावरून तात्काळ देण्यात यावे.यासह विविध मागण्या विषयी चर्चा करण्यात आली आहे.सरकार कडे प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन येणाऱ्या 10 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन वर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांचा महामुक्कामी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी इशारा दिला आहे.यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉ. संजुताई शहारे, ममता भैसारे,वैशाली लोनबले, ज्योती मोहूरले यासह तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments