वडसा तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने होते रात्रीच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक, महसूल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे याला जबाबदार कोण? कारवाईची होत आहे जनतेकडून मागणी...


विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज 





देसाईगंज 
 मिळालेल्या माहितीनुसार देसाईगंज तालुका अंतर्गत येत असलेल्या सोनी ,सावंगी व इतर नदी काटाच्या पात्रातून रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून रात्रीच्या सुमारास देसाईगंज शहरात व परिसरातील काही गावांमध्ये वाळू वाहतूक केली जाते मात्र महसूल प्रशासन अंगावरती पांघरून घालून कोमात असलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत चाललेला असून याला जबाबदार कोण? अशी चर्चा आता तालुक्यातील जनमानसात रंगू लागली आहे. शहरालगत असलेल्या काही गावातील व शहरातील अवैध वाळू तस्करी करणारे तस्कर रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून रात्रीचे सुमारास देसाईगंज शहरात लगत परिसरातील गावात वाळूची वाहतूक करतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मात्र या गंभीर बाबीकडे देसाईगंज महसूल विभाग कानाडोळा का? करतो आहे असा प्रश्न जनमानसात पडला आहे. अवैध वाळू वाहतूक होत असताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याने स्थानिक महसूल प्रशासन करतो तरी काय? असा सवाल सुद्धा जनमानसाच्या तोंडून चर्चेला येत आहे महसूल प्रशासनाने शहरात व नदी परिसरात गावात रात्रीच्या सुमारास गस्ती पथक लावून अवैधरीत्या होणाऱ्या वाळू चोरीला आळा घालावा अशी मागणी देसाईगंज तालुक्यातील जनमानसात आता जोर धरू लागली आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी या अवैध वाळू वाहतुकीकडे लक्ष घालून होणारी अवैध वाळू चोरी वाहतूक थांबबावी असे सुधा सामान्य जनतेमधून बोलले जात आहे. रात्रीच्या सुमारास देसाईगंज शहरातून बिनधास्तपणे वाळूची वाहतूक होत असल्याने रात्रीच्या वेळी लोकांची ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे 
झोप मोड होत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे .रात्रीच्या सुमारास गस्ती पथक लावले आहेत तर मग वाळू वाहतूक होते तरी कशी ? यावरून महसूल प्रशासनाचे वाळू तस्करांसोबत काही साठे लोटे तर" नाही ना..! अशी शंका आता जनतेमधून व्यक्त होऊ लागली आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून अवैध वाळू वाहतूक करणारे वाळू तस्कर रात्रीच्या सुमारास खुद्द नदीपात्रात jcb मशीन टाकून ट्रॅक्टर वाळूने भरल्या जातात अशी माहिती आहे. मात्र तालुका महसूल प्रशासन निद्रा अवस्थेत दिसत आहे . सुज्ञ नागरिकांनी  अवैध वाळूची वाहतूक महसूल विभागाने बंद करून कारवाई 
केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमच्या प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना दिला आहे .
सबंधित देसाईगंज येथील तहसीलदार 
मॅडम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता 
फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही 


0/Post a Comment/Comments