मुरमाडी येथे भव्य खुली कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन...

विदर्भ दखल न्यूज 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 



गडचिरोली 
खेळाच्या माध्यमातून एकतेची भावना प्रत्येकानी जपावी माजी आमदार डॉ. देवराव होळी.
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली -जय बजरंगबली मंडळ, मुरमाडी यांच्या वतीने आयोजित भव्य खुली कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. देवराव होळी हे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत वाघरे (माजी जिल्हाध्यक्ष), प्रकाश गेडाम (जिल्हा महामंत्री), नवनाथ उके (शिवसेना नेते), विवेक खेवले (माजी पंचायत समिती सदस्य), भोगेश्वरजी कोडाप (सरपंच, मुरमाडी), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य), भगवाणजी चुधरी, अशोक भुसारी (तंटामुक्त समिती अध्यक्ष, मुरमाडी) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना मौशिखांब विरुद्ध गुंजणवाडी या संघांमध्ये खेळविण्यात आला. या सामन्याने स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली.


याप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अध्यक्षस्थानावरून खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळ हा केवळ शारीरिक विकासासाठी नव्हे तर शिस्त, संघभावना व सामाजिक एकतेचा मार्ग आहे. खेळातून गावागावात ऐक्य निर्माण व्हावे, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडाक्षेत्रात प्रगती करावी, तसेंच या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही निधी शिल्लक राहील तो गावाविकासासाठी कामी लावावा असे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व खेळाडू व ग्रामस्थांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जय बजरंगबली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

0/Post a Comment/Comments