जुन्या वादाचा राग पकडून मजुराला केली बेदम मारहाण.. आरमारी तालुक्यातील घटना...


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 



आरमोरी 
जुन्या वादाचा राग पकडून मजुराला केली बेदम मारहाण आरमोरी तालुक्यातील घटना शेतामध्ये असलेल्या लाकडाच्या प्रकरणावरून आणि जुन्या वादामधून आणि या वादाचा राग पकडून एका मजुरा ला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे आरमोरी तालुक्यातील सलंगटोला परिसरात घडली आहे मजुराच्या भावाला आणि त्याला सुद्धा बेदमपणे मारहाण केली आहे या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार विश्वनाथ चंद्रभान बावणे वय 55 वर्ष राहणार थोटेबोडी हे मोलमजुरी करून आपल्या




 कुटुंबाचा उदरनिर्वाह गाळा चालवितात मात्र 24 डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजेच्या सलंगटोला या गावी बांधकामाच्या कामावर गेले असता गावातीलच मनोज भैसारे याने तिथे येऊन तू माझ्या शेतातील लाकडी खोड का नेले असे विचारून त्यांच्याशी वाद घातला आणि हुजूर घातली मात्र काही सुज्ञ समजदार नागरिकांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद शांत झाला आणि सायंकाळी त्याला गाठून त्याच्यावर हल्ला सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मात्र सकाळचा वाद मिटला असतानाच सायंकाळी सहा वाजता सुमारास विश्वनाथ हे आपले भाऊ विनायक यांच्यासोबत मोटर सायकलने थोटेबोडी गावाकडे परत जात असताना अर्ध्या रस्त्यात मनोज भैसारे आणि



 त्यांच्या दोन मुलांनी सिद्धांत व तुषार यांनी त्यांना वाटेत अडविले आणि काही समजून न घेता तिघं जणांनी मिळून विश्वनाथ व त्यांच्या भावाला लाथा बुक्यांनि बेधम म्हणत केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे विश्वनाथ बावणे यांच्या उजव्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी विश्वनाथ बावणे यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरमोरी पोलिसांनी मनोज बावणे त्यांच्या दोन मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले घटनेचा पुढील तपास करीत आहेत

0/Post a Comment/Comments