सिरोंचा येथे आरपीआयची बैठक संपन्न....

विदर्भ दखल न्यूज 
संपादक - मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली.




सिरोंचा - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिरोंचा ची बैठक तालुका अध्यक्ष अंकलु कलकोटा यांच्या अध्यक्षतेखाली तर आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाई नेते गोपाल रायपुरे अहेरी - सिरोंचा सर्कल प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर बैठकीत प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले की सिरोंचा परिसरात RPI पक्ष वाढवायचा असुन होवु




 घातलेल्या जिल्हा परिषदेत या भागातुन एखादा उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी सुरु असुन येत्या १२ फरवरी २०२६ ला भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वात दिल्ली ससंद भवनावर मोर्चा न्यायचा आहे तरी या परिसरातील बांधवानी मोर्च्यात सामील होण्यासाठी सहभाग दर्शवावा असे आवाहनही बोरकर यांनी केले.






बैठकीला चंदु गोंगुला ,सठवली रामलु मेडीर्झला ,मनोज वनप्पाकलावार सिरोंचा ,विजय बालय्या चिलमुला , संदिप अंकलु कलकोटा ,गट्टु बत्तुला 'अंकु मालु पुलगंटी , बच्चय्या पुलोवी ,सत्यंम गज्जला तिरुपती आयला , चंदु गोंगला आदि साहित बहुसंख्य आरपिआय कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments