विदर्भ दखल न्यूज
आरमारी ब्युरो
आरमोरी :- आरमोरी येथिल साई दामोदर मंगल कार्यालय मध्ये दिनांक 22 /12/ 2025 रोजी हॉलमार्क जागरूकता शिबिर कार्यक्रम संपन्न झाला
सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने मानक ब्यूरो नागपूर शाखा कार्यालाय अधिकारी निशा कंनबर्गी तसेच नरेश गजभियें हालमार्क प्रतिनिधी नागपूर, आर्थिक सल्लागार प्रवीण गिरडकर ,जीएसटीचे सल्लागार नीतू वाराणसीवार हे सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते
आरमोरी सराफा असोसिएशनच्या वतीने आयोजित सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण हर्षे होते
सदर कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने ब्रह्मपुरी, आरमोरी, वडसा गडचिरोली येथील संपूर्ण सराफ असोसिएशनचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते या कार्यक्रमाला कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने वैज्ञानीक हॉलमार्क नवीन माहिती, चांदी आणी सोनें मध्ये हॉलमार्किंगची आवश्यकता ,प्रत्येक सराफा दुकानदाराने लायसन बनविणे आवश्यक आहे यासाठी
हालमार्क जागरूकता कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की सराफा असोशियन मध्ये व्यापारी उद्योगाच्या संबंधाने सर्व व्यापाऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या प्रगतीचा व्यापार शुद्ध आणि प्रभावी उद्देश आणि रचनात्मक बाबतीत घडून यावा यासाठी ह्या शिबिराचे आयोजन प्रामुख्याने करण्यात आले भारतीय मानक ब्युरो च्या माध्यमातून हॉलमार्किंग योजना या विषयाच्या संबंधी सदर कार्यक्रमांमध्ये सविस्तर असा मार्गदर्शन मान्यवराच्या हस्ते प्रामुख्याने करण्यात आले त्याचप्रमाणे हॉलमार्किंग च्या संदर्भात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असून जीएसटी, इन्कम टॅक्स ,संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या वेळी बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरमोरी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण हर्षे ,उपाध्यक्ष बबन बेहेरे ,जितेंद्र खरवडे, कोषाध्यक्ष अतुल डुंबरे ,सचिव विनोद बेहरे व सराफ असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते


Post a Comment