विदर्भ दखल न्यूज
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
आरमोरी नगरपरिषद मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल जनतेनी दिला मात्र निवडणूक च्या निकालामध्ये सिस्टीम दोषी असल्याचा घनाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषद देत केला
पत्रकार परिषदेला माहिती देताना डॉक्टर रामकृष्ण मडावी म्हणाले की सदर निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅड सुद्धा नव्हत्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीन चाचणी करताना किंवा ट्रायल घेताना फक्त दहा मतदारांची चाचणी घेतली हे बरोबर नाही कमीत कमी 25 टक्के मतदारांची चाचणी घ्यायला पाहिजे होती त्यामुळे सदर प्रशासकीय यंत्रणेवर माझा आक्षेप आहे
जनतेला मी अजिबात दोष देणार नाही कारण जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने होती जनतेने आम्हाला हरवलेले नाही मात्र (मशीन) मतदान यंत्र हे होते त्यांच्यामध्ये काहीतरी सेटिंग करण्यात आली त्यामुळे आमचे उमेदवार सेटिंग मुळे हरले तीन दिवसांपूर्वी मीडियाच्या सर्वेनुसार राष्ट्रवादी पक्षाचे एकूण नऊ ते दहा उमेदवार निवडून यायला पाहिजेत असे सांगत होते मात्र ज्यावेळीस रिजल्ट लागला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे तीनशेच्या वर आकडा पार करू शकले नाही त्याच्यामुळे कुठेतरी सेटिंग असल्याचा प्रकार जाणवला जनता आमच्या बाजूने भक्कमपणे उभी होती जनतेमधून भाजपच्या लीडरशिप वर पण आक्षेप
घेण्यात आलेला होता तसेच काँग्रेसच्या लीडर सुद्धा आक्षेप होता मात्र राष्ट्रवादीच्या लीडरशिप वर कोणत्याही पद्धतीचा नव्हता त्यामुळे आपण जनतेला अजिबात तोच देणार नाही मात्र जनतेनी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात पसंती असतांना सुद्धा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पार्टीचा उमेदवार हा निवडून येण्याची स्थिती मीडिया मध्ये असताना असताना सुद्धा 2000 च्या फरकाने पडतो हे कुठेतरी न पटण्यासारखे आहे आकडा कुठेतरी न पचण्यासारखा आहे की खंत सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली सदर पत्रकार परिषदेला माजी नियोजन समितीच्या सदस्य कल्पना तिजारे ,विधानसभा क्षेत्राचे सहप्रमुख सुनील नंदनवार, अध्यक्षपदाचे उमेदवार जयकुमार मेश्राम ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमीन लालानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, रामदास दहीकर उमेदवार, पिंकु झरकर ,बांगरे आदी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment