आरोपीला पोलीस पकडायला गेले असता पोलिसावरच झाला गोळीबार...


विदर्भ दखल न्यूज 
पुणे ब्युरो 



पुणे
मिळालेल्या माहितीनुसार
आरोपीला पोलीस पकडायला गेले असता पोलिसावरच झाला गोळीबार पुणे येरवडा एका वाहन तोडफोडीच्या प्रकरणातील गुन्हेगाराला फरारी असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी




 पोलीस पथक गेले असता त्या सराईत गुन्हेगारांने पिस्तुलातून पोलिसावर गोळीबार गेला मात्र समय सुचकता दाखवीत पोलिसांनी स्वतःचे रक्षणार्थ गोळीबार केल्याने गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली मात्र त्याच्यावर उपचार सुरू आहेत एखाद्या चित्रपटाचे क्षणानुसार चित्रपटाला शोभेल असा प्रकार त्या ठिकाणी घडला असल्याची

 सूत्रांकडून माहिती मिळाली आहे रस्त्यावर शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे ओमकार भंडारी असे गोळीबारात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चंदन नगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारास भंडारे आणि त्यांच्यासाथीने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची कुऱ्हाडीने तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती अशी माहिती आहे या प्रकरणी चंदन नगर पोलिसांनी दोघांवर बेकायदा हत्यार बाळगणे आणि परिसरात दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे

0/Post a Comment/Comments