विदर्भ दखल न्यूज
वडसा
भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वडसा येथे मुख्य मार्गावर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्रदीप हरबाजी मुंगीकोल्हे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील
मेंढेबोळी येथील प्रदीप हरबाजी मुंगीकोल्हे वय 27 वर्ष हा आपल्या सहकारी सोबत सावंगी येथे जात असताना सायंकाळच्या सुमारास वडसा येथील मुख्य मार्गावर आदर्श शाळेजवळ एका भरधाव वेगाने याणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मुंगीकोल्हे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी विजय
देवगडे हा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटना स्थळावर लोकांची गर्दी जमली होती .लगेच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे अशी माहिती मिळाली आहे
पुढील तपास वडसा पोलिस करीत आहेत.



Post a Comment