भारतातील समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांना हैदराबाद येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी अनु मॅडम च्या हस्ते बहाल.. गोपाल रायपुरे यांचा सन्मान.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


हैद्राबाद - लुजियाना युनिव्हरसिटी (USA) तर्फे देण्यात येणाऱ्या डॉक्टरेट पदवी समारंभ सुंदरिया हॉल हैद्राबाद येथे दि. २८ डिसेंबरला आयोजक अनु भारद्वाज हैद्राबाद यांचे हस्ते डॉक्टरेट पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. मनमोल डोळे कर्नाटक डॉ. शिमा गंगाराम तेलंगणा डॉ. प्रा. बिटला प्रभाकर डॉ. गोपाल बामणा डॉ. रमेश दिवाकर आदिच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
भारतातील समाजासाठी गरीबांच्या उत्थानाकरीता झटणारे समाजसेवक यांना डॉक्टरेट पदवी देण्यात येतो असे डॉ. रमेश दिवाकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.


डॉक्टरेट पदवी घेतांना व्याहाड चंद्रपुर चे डॉ.गोपाल रायपुरे डॉ. समयसिंग बौद्ध उत्तरप्रदेश डॉ. सुभाष वाघमारे निजामाबाद डॉ. कुलदिप शैलेश खोब्रागडे औरंगाबाद डॉ उमेश विजयकुमार कर्नाटक डॉ. सोमेश्वर बंगलोर डॉ. विलास ढोंबळे मुंबई डॉ. श्रीनिवास भारती उत्तरप्रदेश डॉ. पाणीकिशोर तेलंगणा डॉ. शाहीद वजीरखा पठाण महाराष्ट्र डॉ. सखाराम झोंडे सिरोंचा डॉ. विनित जॉर्ज डॉ. पठाण बाजीद खॉन डॉ. रमेश गालीपल्ली रेंगुठा डॉ. संगिता प्रेमनाथ खोब्रागडे आलापल्ली


संपूर्ण भारतातील सामाजिक कार्यात अंग्रेसिव असलेल्या ५० कार्यकर्त्यांचा डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता गडचिरोली येथील प्रा. मुनिश्वर बोरकर शंकर सेनिगारपु प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन शंकर भैय्या हैद्राबाद यांनी केले.

0/Post a Comment/Comments