पारंपरिक इलाखा ग्रामसभा व ग्रामसभा महासंघ धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित क्षेत्रातील पेसा वनहक्क कायदा दिवस उत्सव संपन्न.. उत्सवाच्या निमित्ताने विविध विषयावरीली विकासात्मक ठराव पारित...


विदर्भ दखल न्यूज 
धानोरा ब्युरो 



धानोरा 
परंपरिक ईलाखा ग्रामसभा धानोरा तथा ईलाका ग्रामसभा महासंघ धानोरा यंच्या संयुक्त विद्यमानाने,अनुसूतीत क्षेत्रातील पेसा आणि वनहक्क कायदा दिवस 24 डिसेंबर 2025 धानोरा इलाका पेसा महोत्सव कार्यक्रम, स्थळ. सल्ला गांगरा गोटूल परिसर ग्रामसभा मुंगनेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमचे उदघाटक,तिरुमय.. शिवराम बाबुराव वालको. (गाव पुजारी,) सहउदघाटक तिरुमय. नाजूकराव देवजी तोफा (ईलाखा माझी). कार्यक्रमाचे



 अध्यक्ष तिरुमय. दौलतसहा प्रतापशहा मडावी ( माजी जमीदार धानोरा ईलाखा). उपध्यक्षा श्रीमती. विमलबाई करंगशहा मडावी ( जिल्हा महाग्रामसभा सदस्य) ध्वजारोहन.. तिरुमय. दुरुजी जंगली मडावी ( इलाका भूम्या ) मुख्यमार्गदर्शक,म्हणून लाभलेले तिरुमय Dr. देवाजी नवलू तोफा (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेंढा (लेखा ) व विशेष अतिथी म्हणून लाभलेले धानोरा ईलाखा 32 गावातील गावपूजारी उपस्थित होते. व पदाधिकारी व कर्मचारी ग्रामसभा अध्यक्ष / सचिव, पोलीस पाटील, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पेसा मोबाईलईजार, तलाठी, वनरक्षक, ग्रामसेवक,



 ग्रामरोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, कोतवाल, ग्रामसभा मेट, तांत्रिक सहाय्यक, सेवानिवृत्त शिक्षक, मुक्तीपथ संघटना धानोरा, कार्यक्रम मध्ये उपस्तित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली धानोरा इलाका 32 गावातील महिला पुरुष, युवक, युवती मोट्या प्रमाणात उपस्थित होते. परंपारीक इलाका सामाजिक संघटना बांधणी करण्यात आली. पेसा कायदा 1996 व आणि वन अधिकार कायदा 2006 ई लाखातील सर्व ग्रामसभाना कायदा बद्दल चर्च करण्यात आली. ग्रामपंचायत अधिनियम कलम 54 ( अ ) 54 (ब )54 (क ) 54 (ड ) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा ) ग्रामसभाचा पेसा अधिकार व आदिवासीचा रूढी, प्रथा, परंपारा जतन करणे या सर्व पेसा तरतुदीचा कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित करण्यात आली.वन अधिकार कायदा 2006 व पेसा कायदा 1996 या दोन्ही कायदा अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गौण वन उपज करिता वाहतूक परवानाजारी करण्यासाठी परिपत्रक 27नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामसभेला T. P. परवाना देण्याचे अधिकार देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात गट चर्चद्वारे


 गावाग्रामसभाचे ठराव नुसार इलाका ग्रामसभा महासंघ द्वारे t. P. छापून गावाग्रामसभेला देण्यात येईल. तेंदू व बांबू व इतर गोण वन उपज विक्री विल्हेवाट ईलाखा ग्रामसभा महासंघ चा नियंत्रणाखाली स्वतः गावग्रामसभा करेल. आणि धानोरा इलाकातील 32 गाव ग्रामसभाचा एक युनिट तयार करण्यात आली. असे गट चर्चद्वारे सर्वसहमतीने ठराव पारित करण्यात आली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामसभा यंत्रणा स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी इलाकातील प्रत्येक ग्रामसभा सक्षम असेल. असे गट चर्च द्वारे सविस्तर चर्चा करून सर्वानुमते ठराव पारित करण्यात आली.
सन 2025 मध्ये आदिवासी विकास महामंडळ कडून नियोजित वेळी धान खरेदी होत नसल्याने शेतकरी व्यापारीचं बळी पळत असून शेतकरी यांचे शोषण होत आहे. शेतकरी शेती करण्यासाठी कर्ज, उष्णवर करून शेती करीत असतो.पण वेळेवर धान खरेदी होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. म्हणून या गटचार्चद्वारे धान खरेदी व विक्री व इतर गोण वन उपज खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ कडून थेट निधी ग्रामसभेला प्रशासनाने देण्यात यावे. ग्रामसभा धानखरेदी करून शासना कडे देईल, अशी गटचार्चद्वारे सर्वनुमते ठराव पारित करण्यात आली.
आदिवासी समाजामध्ये आमचेच आदिवासी आदिवासी लोक दुसऱ्या धर्माचा धर्मांतर करीत आहेत. त्यावर गट चर्च द्वारे धर्मांतर करणारे आमचे आदिवासी यांना आदिवासीचा कोणतेच आरक्षण मिळणार नाही. आदिवासीचा योजना किंवा सवलत, मिळणार नाही. ग्रामपंचायत कार्यालय येथून आदिवासी चा नावाने कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही, व त्यांना मालकी हक्कचे वारसन हक्क मिळणार नाही. असे गटचार्चद्वारे सर्वसहमतीने ठराव पारित करण्यात आली. पेसा व वनहक्क कायदाबद्दल आणि ग्रामसभेचा अधिकार, कर्तव्या, जबाबदारी, बाबतीत जनजागृती करण्यात आली. पेसा कायदा अंतर्गत अबंध निधी बद्दल सविस्तर चर्च करण्यात आले. तसेच मादक द्रव्य व्यसन मुक्त करण्यासाठी 32 गावाच्या ग्रामसभांना या गटचर्चाद्वारे दिव सेन-दिवस व्यसन अभावी आमचे अनुसूचित क्षेत्रा मध्ये व्यसनचे प्रमाण वाढलेला आहे. करिता या चर्चेद्वारे पेसा कायदा, मध्ये प्रकरण आठ प्रमाणे मादक द्रव्य पदार्थांची विनियमन करण्याच्या अधिकार ग्रामसभेला दिलेली आहे. व मादक द्रव्य नियंत्रण समिती घटित करून मादक द्रव्य नसामुक्ती करण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याच्या ठराव पारित करण्यात आले,असे वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंपारिक सामाजिक ईलाखा ग्रामसभा संघटना धानोरा व गाव ग्रामसभा ची संघ, इलाका ग्रामसभा महासंघ धानोरा च्या वतीने 24 डिसेंबर 2025 च्या पेसा महोत्सव कार्यक्रम ग्रामसभा मुंगनेर येथे संपूर्ण विषयांची ठराव पारित करण्यात आले, या कार्यक्रम मध्ये सूत्रसंचालन, तिरुमाल, कृष्णा भुरकुर्या,ग्रामसभा सचिव माळंदा कार्यक्रमची प्रास्ताविक, तिरूमल शामराव रामसिंग उसेंडी ग्रामसभा पवनी,सचिव कार्यक्रमात सहकार्य करणारे तिरूमय सामसाय मातलामी ग्रामसभा कांदळी, सचिव आभार प्रदर्शन तिरूमाल, प्रदीप मुरलीधर बोगा तालुका ग्रामसभा महासंघ सचिव, या कार्यक्रमांमध्ये ग्रामसभा मुंगनेर, ग्रामसभा येणगाव, कार्यक्रम मध्ये योगदान दिले.

0/Post a Comment/Comments