विदर्भ दखल न्यूज
भंडारा
पवनी ब्युरो
कर्जापायी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील घटना भंडारा जिल्हा अंतर्गत येत असलेल्या पवनी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने करजपाई विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवनी तालुक्यातील कोदुर्ली या गावातील रहिवासी असलेल्या आणि अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विवंचनेमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गणपत राजाराम तेलमासरे वय 47 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मंगळवार रोजी सकाळी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . प्राप्त झालेल्या माहितीनुसार गणपत तेलमासरे सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी स्वतःच्या घरामध्ये विश्वप्राशन करून विष प्राशन केले असल्याचे घरच्या लोकांना आढळले असता घरच्या लोकांनी त्याला लगेच तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र प्रकृती अती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचाराकरिता भंडारा येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यास सांगितले मात्र रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असतात तिथे डॉक्टरांच्या उपचारांती त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे.डॉक्टरने शर्तीचे प्रयत्न केले मात्र
डॉक्टरांचे प्रयत्न असफल झाले मृत्त गणपत तेलमासरे अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांच्यावर बँकेचे आणि काही खाजगी सावकारांचे मिळून सुमारे पंचवीस लाख रुपयांचे कर्ज होते असे बोलले जात आहे. काही दिवसापासून कर्जांच्या विवंचनेत आणि मानसिक त्रास ताणतणावात सुद्धा होते आणि यामधूनच त्यांनी टोकाची भूमिका घेतली असावी असे सुद्धा जनतेमधून बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी विश्वसन करून आत्महत्या केल्याने परिसरात व गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे



Post a Comment