विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
तालुक्यातील विहीरगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थाच्या मार्फतीने चालविण्यात येणारे धान्य खरेदी केंद्र मागील काही वर्षापासून बंद असल्याने याचा भरपूर त्रास शेतकऱ्यांना होत आहे आणि हे खरेदी केंद्र चालू व्हावे याकरिता विहीरगाव परिसरातील मोहटोला येतील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य मुनेश्वर भैसारे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसोबत आरमोरी येथील सहकारी निबंधक अधिकारी वानखेडे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर संस्थेबद्दल माहिती जाणून घेतली व चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने विहीरगाव येथील संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती जाणून घेण्यात आली सदर माहिती समाधानकारपूर्वक मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते मुनेश्वर भैसारे व शेतकऱ्यांनी निबंधक अधिकारी वानखेडे साहेब यांचे आभार मानले आहे .संस्थेच्या पुढील कामकाजाबद्दल सखोल मार्गदर्शन करू असे निबंधक अधिकारी वानखेडे साहेब यांनी उपस्थित शेतकरी सामाजिक कार्यकर्ते मुनेश्वर भैसारे यांना सांगितले आहे.


Post a Comment