आदिवासीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज.. माजी आमदार डॉ .देवराव होळी

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे. आदिवासी बांधवांनी पाच पंच सुत्राचा उपयोग करून जिवन जगले तर आदिवासी बांधवांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मोहटोला येथील कार्यक्रमा प्रसंगी केले.
गडचिरोली तालुक्यातील मोहटोला (बेलगांव ) येथे ऐतिहासिक विजय दिवश सोहळा व भुमीपुजन दि. १८ डिसेंबर २०२५ ला आरपिआयचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.



कार्यक्रमाचे उदघाटक सामाजिक कार्यकर्ता अरविंदभाऊ कात्रटवार तर दिप प्रज्वलन विद्याताई दुगा मॅडम यांचे हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणुन आदिवासी नेत्या वर्षा कन्नाके झनकलाल मंगर ,उपाध्यक्ष मारोती भैसारे लहुकुमार भैसारे सामाजिक कार्यकर्ता मनोजभाऊ उके भुमक रामचंद्र कांटेंगे ,



 यादव कोहपरे नानाजी काळबांधे विनोद चापले , यादव चौधरी मोहटोला मोनेश उंदिरवाडे तुळसिदास मडावी नाजुक होळी दिवाकर होळी प्रेमदास होळी मधुकर होळी मोहटोला आदि लाभले होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांचे हस्ते भुमीपुजन पार पडले तर प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की जो आदिवासी बांधव संविधानाची आठवण करेल तोच आदिवासी पुढे जाईल शिका संघटित व्हा संघर्ष करा तरच आदिवासींचे भवितव्य आहे.



रात्रौ ८ वाजता गोंडी व छत्तीसगडी डॉन्स पार पडले.सदर कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश होळी सचिव प्रमोद होळी उपाध्यक्ष निलेश होळी अविनाश मडावी संचालक झलकराव आत्राम मोहटोला नाजुक भैसारे मोरेश्वर उंदिरवाडे आदि सहीत मोहटोला परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन झुनकलाल आतला प्रास्ताविक नाजुक होळी तर आभार झनकलाल मंगर यांनी मानले.

0/Post a Comment/Comments