भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी हळदवाही रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध समस्या घेऊन गेले तहसील कार्यालयावर...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


चामोर्शी -अनेक लोकांचे रेशन कार्ड खूप दिवसापासून भेटत नव्हते तसेच काही लोकांचे सात बाऱ्यावर नाव चढत नव्हते हे सर्व गोष्टी भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या रेगडी येथील जनसंपर्क कार्यलयात येऊन नागरिकांनी सांगितले त्यावर सुरेश शहा यांनी तात्काळ तहसील कार्यालय गाठून सर्वांचे समश्याचे समाधान कसे करता येईल याबाबत तहसीलदार तथा नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा केली आणि लवकरात लवकर सर्वांचे काम करून देऊ असे आश्वासन दिले त्यापैकी काही लोकांचे काम लगेच करून पण दिले त्यामुळे सुरेश शहा यांनी त्यांचे आभार मानले


*जनतेचे कोणतेही समस्या असो आपल्या पर्यंत जो येतो आपण त्याचा काम पूर्ण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि काहीही समस्या असल्यास सुरेश शहा यांच्या जनसंपर्क कार्यालय रेगडी आणि दुसरे जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे संपर्क करावा असे आव्हान सुरेश शहा यांनी केले तसेच त्या सर्वांचा तात्काळ समाधान करण्यात येईल असा विश्वास पण सुरेश शहा यांनी व्यक्त केला*

यावेळी सामाजिक कार्यकते तथा शिवसेना जिल्हासचिव प्रशांत शहा देवाशिष पालं आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments