विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव जवळील मारदा गावात असलेले BSNL चे टॉवर कुचकामी झाले असुन सदर गावातून कुणाचेच फोन लागत नाही त्यामुळे BSNL च्या ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही.
मारदा गावात लाखो रुपये खर्चुन BSNL ने मारदा परिसरातील लोकांच्या सेवेसाठी टॉवर उभारले आहे. परंतु सदर टॉवर कुचकामी असुन BSNL ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फोन करायचेच
असेल तर मारदा गावकऱ्यांना पोटेगांव आल्यानंतरच call करावे लागते. तेव्हा BSNL कंपनीने सदर टॉवर दुरस्ती करून ग्राहकांना योग्य सेवा पुरवावी अशी मागणी मारदा ग्रामपंचायतचे सरपंच पोटावी व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नरोटे यांनी केलेली आहे.


Post a Comment