वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम (Angel Beats) 2025 26 मोठ्या थाटात साजरा...

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 


​आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी महाविद्यालय, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा गांधी कन्या विद्यालय आणि वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम २७/१२/२०२५ शनिवारी आणि २८/१२/२०२५ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन आणि उद्घाटन वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या टीम द्वारे करण्यात आले.
​सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. मनोजभाऊ वामनरावजी वनमाळी (सचिव, मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ) होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती सुनिताताई मुरलीधरराव वनमाळी (अध्यक्षा, म.शि.प्र. मंडळ), कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री. दिपकजी देवतळे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती आरमोरी) आणि इतर अतिथी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून फित कापून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत इयत्ता ८वी/१०वी च्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर स्वागतगीताने केले. तसेच स्वागतार्थ नृत्य देखील सादर करण्यात आले.
​या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री. नूरअलीभाईजी पंजवानी (उपाध्यक्ष, म.शि.प्र.मं.), श्री. दिपकजी बेहरे (सहसचिव म.शि.प्र.मं.), श्री. हरिश्चंद्रजी बोंद्रे (कोषाध्यक्ष म.शि.प्र.मं.), श्री. राजेशजी वडपल्लीवार सर (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती आरमोरी), श्री. उमाकांतजी वनमाळी, श्री. धनंजयजी वनमाळी, श्री. दिपकरावजी वनमाळी, श्री. प्रकाशजी भोयर, श्री. मयुरजी वनमाळी, श्री. निशांतजी वनमाळी उपस्थित होते.



​तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. डॉ. लालसिंगजी खालसा सर (प्राचार्य, म. गांधी महाविद्यालय), श्री. साईनाथजी अद्द्लवार सर (प्राचार्य, म. गांधी कनिष्ठ महाविद्यालय), श्री. प्रकाशजी पन्धरे सर (मुख्याध्यापक, म. गांधी कन्या विद्यालय), श्री. विलासजी आंबोरकर सर(उपप्राचार्य म. गांधी कनिष्ठ महाविद्यालय) श्री. वीरेंद्र गुफावार सर, (उपप्राचार्य म. गांधी कन्या विद्यालय) श्री. विजयजी चाटे सर (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर)
​सौ. विलासजी गोंधोले (उपाध्यक्ष पालख शिक्षक संघ, वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर)
​सौ. उमेशजी हर्षे (उपाध्यक्ष पालख शिक्षक संघ, म. गांधी कनिष्ठ महाविद्यालय)
​श्री. पवनजी वनमाळी (उपाध्यक्ष म. गांधी कन्या विद्यालय)
​श्री. नितीनजी कासार (प्राचार्य)वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स, श्री किरणजी मांडवकर (पर्यवेक्षक, डब्लू.ओ.एस.ओ.एस.) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
​सत्कारमूर्ती श्री दिपकजी देवतळे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती आरमोरी) आणि श्री राजेशजी वडपल्लीवार सर (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती आरमोरी) या मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि शिल्ड देऊन मानसन्मान करण्यात आला. श्री देवतळे साहेबांनी विविधांगी शिक्षण, स्पर्धा परीक्षेची ओळख, कॉपीमुक्त अभियान, पालक व शाळा यांचे योग्य समन्वय, इत्यादी बाबींवर मार्गदर्शनपर प्रकाश टाकला. संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना त्यांनी असे म्हणाले की, मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे सर्व विद्याशाखांचे परिसरातील सर्व नागरिकांशी उत्तम प्रकारे सुसंवाद राखून परिसराच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे, असे गौरवौद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
​अध्यक्षीय भाषणात श्री मनोजभाऊ वनमाळी यांनी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखा आणि वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्रगतीबाबत माहिती दिली. तसेच संस्थेमार्फत संचालित सर्व विद्याशाखांच्या शैक्षणिक सुविधांचा सर्वाधिक अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कलागुण आणि क्रीडा कौशल्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व झटणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक श्री रविकांत मस्के सर, अध्यापिका गुलनाज शेख, नंदा लोणारे, शितल कत्रे, लक्ष्मी पटेल आणि मनिषा दडमल व विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन अध्यापिका मोनिका ,पांचलवार आणि श्री किरण मांडवकर यांनी केले.

0/Post a Comment/Comments