देसाईगंज नगरपरिषद निवडणूक; काँग्रेस पक्ष प्रचारात आघाडीवर . सत्तातराची चाहूल, सर्वसामान्य जनतेत काँग्रेसबाबत अनुकूल वातावरण...


विदर्भ दखल न्यूज 
देसाईगंज ब्युरो 


देसाईगंज – आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचारयात्रांना वेग दिला असून, यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रश्नांना तोंड देणाऱ्या जनतेत काँग्रेसबाबतचा कल स्पष्टपणे जाणवत असून, शहरातील सर्वसामान्य मतदार सत्तांतराची चाहूल देत आहेत.

काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घरदारी संपर्क मोहीम, पदयात्रा व सभांद्वारे लोकांशी संवाद साधण्याचा जोरदार कार्यक्रम आखला आहे. वाढती पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत काँग्रेसने प्रचारात गती आणली आहे.


दुसरीकडे, स्थानिक पातळीवरील अनेक नागरिकांनी आतापर्यंतच्या प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली असून, बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त करत काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. “यावेळी बदल हवा आहे” असा सूर मतदारसंघात स्पष्टपणे उमटत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यातून जाणवत आहे.

आगामी काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, विविध पक्षांतील स्पर्धा चुरशीची होणार आहे. मात्र प्रारंभीच्या टप्प्यात तरी काँग्रेस पक्ष प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

0/Post a Comment/Comments