विदर्भ दखल न्यूज
: मंगेश बन्सोड
कुरखेडा
कुरखेडा: दिनांक 24 तारखेला कुरखेडा तालुक्यातील भगवानपुर- शिरपूर मार्गावर गोवंश अवध्यरीत्या वाहतूक थांबवण्यासाठी कुरखेडा पोलिसांनी रचलेल्या सापड्यात तीन आरोपी रंगे हात सापडले. चार चाकी पिकप वाहनातून कतलीच्या उद्देशाने ९ गाईंची तस्करी वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक, क्लिनर आणि जनावरांचा खरेदीदार अशा तिघांना अटक करण्यात आल्याची कारवाई 24 नोवेंबर रोजी दुपारी बारा
वाजता करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी भगवानपूर– शिरपूर मार्गावर सापडा रचला. त्या दरम्यान संशयित पिकप वाहन क्रमांक MH 40 BG 8002 तपासणीस थांबवले असता त्यामध्ये नऊ गाईंचे अवध्य वाहतूक सुरू असल्याचे आढळले वाहन चालक जयंत कांबळे ( वय 30 वर्ष )क्लीनर अमित गेडाम (वय 24 वर्ष ) हे दोन्ही राहणार. रावणवाडी तालुका. देसाईगंज येथील रहिवासी आहेत आणि जनावर मालक मोहम्मद सुफियान कुरेशी 27 वर्ष राहणार. देसाईगंज यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत 90 हजार रुपये किमतीचे जनावरे आणि दहा लाख किमतीचे वाहन असा एकूण 10 लाख 90 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राण्यांवर क्रूरतेने वागणूक केल्याप्रकरणी तसेच गोवशांच्या अवध्य वाहतूक संबंधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई कुरखेडा ठाणेदार महेंद्रजी वाघ ( PI ) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम ( PSI ) दयानंद भोंबे ( PSI ) तसेच पोलीस शिपाई संदेश भैसारे, कैलास नेवारे, नरसिंग कोरे आणि प्रकाश साबळे यांच्या पथकाने राबवली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध गोवंश वाहतूक साखळीला मोठा धक्का बसला आहे..


Post a Comment