आंबेडकरवादी संघटनांची रिपब्लिकन आघाडी घोषित....

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली शहरातील आबेंडकरवादी संघटनेनी रिपब्लिकन आघाडी तयार केली असुन गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुका लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. या आघाडीत शहरातील अल्प संख्यांक समुदाय मुस्लीम आदिवासी , ख्रिचन आदि समुदायातील संघटनांना सोबत घेऊन निवडणुका लढविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
या अगोदर शहरातील काही तथाकथीत आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनल तयार केली होती आणि सक्रिय आंबेडकरी संघटनाना हेतु पुरस्स डावलले होते यांची गंभीर दखल घेऊन शहरातील रिपब्लिकन जनतेने आज दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ स्वयंस्कृतीने एकत्रित येऊन रिपब्लिकन आघाडी घोषीत करून निवडणुका लढण्याचे जाहीर केले.
सदर बैठकीचे अध्यक्ष शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्षॲड. विनय बांबोळे हे होते तर सदर बैठकीला परिवर्तन पॅनलच्या वनिता बांबोळे , रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर रिपब्लिकन पक्ष ( आंबेडकर ) पंडित मेश्राम , बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद राऊत रिपाईचे नेते गोपाल रायपुरे वंचितचे नेते गजानन बारसिंगे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रशांत मडावी आदिवासी संघटनेच्या नेत्या वर्षा कन्नाके रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे दशरथ साखरे अध्यक्ष जिवन मेश्राम सचिव रोशन उके चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे बामसेफचे दामोधर शेन्डे प्रमोद बांबोळे शेडयुल कास्ट फेडरेशनचे दिलीप गोवर्धन शरद लोणारे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments