विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
जंगली हत्तीने शेतातील धान्याची केली नासधूस शेतकऱ्याचे झाले मोठे नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.. आरमोरी तालुक्यातील बोरी येथील डोमाजी
खेवले या शेतकऱ्यांने शेतातील धान्य जमा करून आपल्या शेतामध्ये धान्याचे पुंजणे बनवून ठेवले
होते आणि ते धान्य एक दोन दिवसामध्ये शेतकरी चुर्णा चुरायच्या विचारत असताना 15 ..11 2025 शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास जंगली टस्कर हत्तीने शेतामध्ये शिरकाव करून जमा केलेल्या धान्याचे पुंजणे पूर्णतः उपसून फेकले आणि धान्याची तुडवण केली यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सकाळी शेतावरती गेले असता त्यांना पुजणे उपसून
धान्याच्या कडपाचे लोंब्या खाऊन इकडे तिकडे तुडवून फेकल्या दिसल्या यामुळे शेतकऱ्यानी लगेच घटनेची माहिती वनविभागाला दिली आहे वनविभागाने योग्य ती मोका चौकशी पंचनामा करून वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी.. अशी मागणी बोरी येथील शेतकरी डोमाजी खेवले यांनी वनविभागाला केली आहे. वनविभागाने जंगली टस्कर हत्तीवर नियंत्रण ठेवून योग्य तो हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.




Post a Comment